माझ्याबद्दल थोडेसे

 

मी आहे हा असा आहे.

 

 

मी महावीर शहा..वय वर्ष ३५. वर्ष विवाहित पत्नी,एक मुलगा व एक मुलगी  राहणार कुर्डुवाडी (माद्दा, सोलापूर)

शिक्षण बी ए, नोकरी सोलापूरत विद्यानंद को ऑप बॅंक लि ., सोलापूर कंप्यूटर आड्मिनिस्टॅटर म्हणून  ट्रेकिंग, भ्रमंती, कंप्यूटर्स, वाचन, जेवण बनवणे आणि खाणे आणि सामाजिक कार्य असे माझे छंद. वेळ मिळेल तसे छंद जोपसतो. मित्र परिवार खूप मोठा झालाय. जे मला शाळेपासून ओळखत आलेत ते तर म्हणतील हा महावीर आता एकदम विरुद्ध झालाय. शाळेतला लाजरा, काही न बोलणारा महावीर आज नुसती वटवट करतोय. महावीर मित्रांमध्ये सेंटर पॉइण्ट म्हणून कधी नावारूपाला आला ते कळलच नाही. ह्याच श्रेय नक्कीच मी माझ्या काही जिवलग मित्र-मैत्रिणिना आणि माझ्या अप डाउनच्या ग्रुपला देईन. सगळ्याना सांभाळून घेत त्यांच्या सुख- दु:खाचा वाटेकरी होऊन गेलोय.
                 सॉफ्टवेर मध्ये रखडत रखडत शिक्षण पूर्ण केला पण ते कोडिंग आपल्याला जमणार नाही हे आधीच कळल्यामुळे जास्त रुची नाही घेतली. सॉफ्टवेर मध्ये पैसा चिक्कार पण आपल्या दिलाने ते कधीच नाकारला होता. हार्डवेर आणि नेटवर्किंगसाठी मी वेडा आहे,त्यामुळे काही नेटवर्किंग मध्ये शिकायला मिळाले ते शिकत गेलो १९९९ मध्ये  विद्यानंद बॅंकत जॉइन रुजू झालो.तसे पाहता  बँकिंग व माझा काहीही संबंध नाही कारण मी बी. ए. चा विद्यार्थी तरी मनावर घेऊन बँकिंग शिकलो तिथे ब्रॉडबॅंड नेटवर्क सेट अप करायचा काम होता पगार कमी पण जॉइन केला. सुरवातीला चार वर्ष क्यशियर म्हणून व नंतर  कस्टमर सर्विस, टेक्निकल सपोर्ट, फ्लोर सपोर्ट. एसएमई, असिस्टेंट ट्रेनर असा असा पुढे येत गेलो. घरी माझी ही नोकरी कोणालाच पसंत नाही, पण काय करणार…असो.
            मी कुर्डुवाडी सोलापूर १९९९ पासून रोज अप डाउन करीत आहे सुरवातीला म्हणजे ८ वर्ष अप डाउन फार त्रास सहन करावा लागत असे पुढे २००८ ला आमचे अप डाउन मेंबर  श्रीनिवास बागडे,दीपक ढवाणसर,प्रविन चौरे (माढा),नांमदेव खरात(मोहोळ),जाफर पटाण,प्रमोद बळे,विजयकुमार चांदणे,दर्शन शिरसकर,शफिक शेख यानी मिळून प्रवासी संघटना स्थापना करायचे ठरवले त्यानुसार सोलापुर पुणे प्रवासी संघटना  १९.०८.२००८ स्थापन  करण्यात आली. त्यावेळी श्री संजयदादा टोणपे यांचा संपर्क आला आम्ही एकजीवाचे मित्र बनलो.  सोलापुर पुणे प्रवासी संघटना स्थापन करण्याचे मुख्य कारण सोलापुर, पुणे, पंढरपूर,केम,कुर्डुवाडी,माढा ,मोहोळ,पास धारक व प्रवासी यांच्या अडचणी सोडवणे तसेच रेलवे पशासन व प्रवासी याच्यात स्नमय साधणे हे महत्वाचे उद्दीष्ट होते ते आम्ही साध्य केले आहे या काळात खूप खुप नाती जमली आम्ही एका बंधनात बांधलो गेलोय. ह्या रेशमाच्या गाठी कधी तुटू नयेत हीच त्या महावीरा चरणी प्रार्थना…
तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत

तुमचाच,
महावीर