प्रेम म्हणजे काय रे?

 

खालील लेख म टा च्या सौजन्याने

- संपदा वागळे
असं म्हणतात की, स्त्री वेषातील बालगंधर्वांकडे स्त्रियाही मान वळवून पाहत असत. 'एकापेक्षा एक'च्या रंगमंचावर अवचितपणे अवतरलेल्या एका 'सौंदर्यखणीला' बघताना समस्त आयाबायांची नेमकी हीच स्थिती झाली. त्या अप्सरेच्या म्हणजेच 'महागुरूंच्या' अद्भुत लावण्याने आणि मोहक पदन्यासाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या रंगमंचावरील एक 'अविस्मरणीय आविष्कार' म्हणून महागुरूंच्या या अदाकारीची नोंद व्हावी.
' मराठी पाऊल पडते पुढे'मध्येही मल्लखांबाचा समृद्ध वारसा जपणारे कलाकार पाहताना असाच अनुभव आला. मिहीर खेडेकर आणि ग्रुपचा सिंक्रोनाईज्ड मल्लखांब बघितल्यावर 'शिवशाहीर' बाबासाहेब पुरंदरे यांचे उद्गार होते, 'पहायला दोन डोळे अपुरे पडतायत्... टाळ्या वाजवायला दोन हात अपुरे पडतायत्... तुमचं कौतुक करायला शिवबाच हवेत...' ही प्रशंसा ऐकून वाटलं की, 'आता परीक्षकांपैकी कोणीतरी गळ्यातला कंठा किंवा हातातलं कडं बक्षीस म्हणून बहाल करणार. पण कसलं काय? रंगीत कागदाच्या कपट्यांवरच निभावलं.' महागुरूंच्या 'त्या' नोटेसाठी मंडळी एवढा जीव का टाकतात, ते अशा वेळी कळतं. नंतरच्या आठवड्यात याच कार्यक्रमात 'जूचंद', ठाणे येथील कलावंतांनी नृत्याच्या तालावर अक्षरश: ४ ते ५ मिनिटांत साकारलेेलं शंख, चक्र, त्रिशूलधारी शंकराचं शिल्प पहाताना वेड लागायचंच बाकी होतं.
' दिलीप प्रभावळकर' हे किती ताकदीचे अभिनेते आहेत याची झलक 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये दिसली. बोलता बोलता त्यांनी साकारलेला नाना पुंज्ये आणि कृष्णराव हेरंनकर केवळ अप्रतिम. दिलसे सेगमेंटमध्ये 'अण्णा हजारेंनी' साधलेला संवादही तुमच्या आमच्या मनातला. स्वत:च्या जन्मांधतेबद्दल कसलीही खंत न करता, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर गेली २५ वर्षं अंधांसाठी काम करणाऱ्या 'परीमला भट' या हिरकणीची 'सह्यादी' हॅलो सखीमध्ये भेट झाली. प्रसारमाध्यमांची ताकद सांगणारा त्यांचा हा अनुभव. बारावीची बोर्डाची परीक्षा ४ दिवसांवर आली असताना त्यांना अचानक समजलं की १५ मुलांना रायटर्सच मिळालेले नव्हते. एवढ्या मुलांची तातडीने सोय करणं त्यांना आवाक्याबाहेरचं वाटत होतं. दिवसभर धडपडल्यावर शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी रात्री साडेदहाला 'स्टार माझा' वाहिनीला विनंती केली. त्यांनी कॅच लाईन दिली आणि मुलांच्या परीक्षा निर्विघ्नपणे पार पडल्या. समजलं ना, 'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए.' अथांग महासागरात बोट विहरतेय, नाविक लॅपटॉपवर पिक्चर बघतोय तर कधी पुस्तक वाचतोय किंवा मध्येच ब्लॉगही लिहतोय, एकीकडे संगीत सुरू आह, बाजूला वरणभाताच्या कुकरच्या शिट्या वाजतायत. हे वर्णन एखाद्या कादंबरीतलं नव्हे किंवा सिनेमातलं. हा अनुभव (समुद शांत असतानाचा) आहे शिडाच्या बोटीतून जगाची प्रदक्षिणा करणाऱ्या पहिल्या भारतीयाचा, अर्थात कमांडर दिलीप दोंदे यांचा. सह्यादीवरील 'रंग माझा वेगळा' या कार्यक्रमात कमांडर दोंदे यांच्या धाडसांतून अनेक रंग उलगडले. १५७ दिवसांच्या या जलसफरीत त्यांना साथ देणारी 'म्हादेई' (रू।।न्ष्ठश्वढ्ढ) ही बोट बनवताना, एकेका गोष्टीचा केवढा सूक्ष्म विचार केला होता, त्याचं वर्णन तिचे जनक रत्नाकर दांडेकर यांच्याकडून समजलं. खरंच इतिहास घडतो तो अशा जिद्दी माणसांमुळेच.
बाकी मालिकांमध्ये नेहमीचं दळण सुरू आहे. 'मन उधाण'मध्ये फोटोत जाऊन बसलेली गौरी 'नवा चेहरा' घेऊन मोहित्यांच्या घरात परत आलीय. आपण गौरीच आहोत हे पटवण्यासाठी तिची धडपड आणि बाकीच्यांची ती गौरी नाही, हे सिद्ध करण्याची पराकाष्ठा असा हा सामना ऐरणीवर आलाय. काहीतरी नवा मसाला शिजतोय एवढं निश्चित. बाकी त्या एका 'निखिलच्या' मागे सगळ्या मुली धावत का सुटतात, हे एक कोडंच आहे. पुरुषाच्या मनातील वासना स्त्रीला एका नजरेत समजते. मात्र 'स्वप्नांच्या पलिकडले'मधील वैदेहीला डान्सपाटीर्त श्रेयसचा बॉस तोंडाला मास्क लावून कवटाळतो आणि तरी ही मुलगी ती श्रेयसच आहे या समजूतीत नाचतच रहाते, हे पटणं अशक्य. एकीकडे बॉसचा गनिमीकावा आणि दुसरीकडे घरात घुसलेली 'जगदंबा' (अन्विताची आई) नावाची त्सुनामी, पाटकरांच्या घराची नौका पुन्हा हेलकावे खाणार असं दिसतं.

नवं लग्न झालेल्या अभिजित व शमिका या जोडीचं सध्या 'तेरे दु:ख अब मेरे, मेरे सुख अब तेरे' सुरू आहे. बिच्चारी नवी नवरी चारीठाव स्वयंपाक करतेय. छकुलीला सांभाळतेय. आजेसासूचे टोमणे खातेय. पैसे खर्च होतील म्हणून हनिमूनला नको जाऊया म्हणतेय. हे पाहून ताई माई अक्का मुलासाठी वधू संशोधन करताना 'सून कशी व्हावी' या कॉलममध्ये 'माझिया प्रियाला'मधील शमिकासारखी' नाहीतर 'कुंकू'मधील जानकीप्रमाणे, असं लिहू लागल्या आहेत.
मात्र जानकीला 'अंध करून टाकलंय ते बाकी बघवत नाही.' विशेषत: जेव्हा ती विचारते, 'माझ्या माऊचं हसणं, बोलणं, तिचं पहिलं पाऊल, मी कधीच पाहू शकणार नाही का? तेव्हा पोटात कालवले होते. तरीही या धक्क्याने नरसिंह किल्लेदारांचं आपल्या बायकोचं प्रेम उफाळून आलंय ही जमेची बाजू. पण तिची काळजी घ्यायला जी नर्स ठेवलीय त्या बाईची आणि जानकीची जोडी म्हणजे वाघ आणि शेळीचं नातं