शब्दफुले ही आईसाठी

सकाळ वृत्तसेवा

आई... या दोन अक्षरी शब्दात सामावलेलं असतं प्रत्येकाचंच विश्व. जगण्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर या दोन शब्दांशिवाय दुसरी दुनियाच माहीत नसते तिच्या मुलांना. छोटे-मोठे आनंद शतगुणित करणारी, दुःखांची ओझी स्वतःच्या खांद्यांवर वाहणारी, मुलांसाठी, घरासाठी खूप काही सोसणारी अन्‌ तरीही सतत हसतमुख असणारी, आयुष्याच्या प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगात पाठीशी राहून "मी आहे'चा दृश्‍य-अदृश्‍य धीर-दिलासा देणारी, निरपेक्षपणे खस्ता खाणारी, हाल-अपेष्टा सहन करणारी, साऱ्या घरालाच देवालय मानून समईसारखी सतत मंदपणे विलसत राहून स्नेहस्निग्ध उजाळा घरभर पसरणारी व्यक्ती दुसरी कोण असू शकते? आईच तर असते.

ती कधी जगण्याच्या उन्हात माथ्यावरची सुखद सावली होते, वादळ-वाऱ्याचे तडाखे सोसून थरथरत्या दिव्याभोवतीची ओंजळ बनते... अशा आईची महती शब्दांत सामावू शकणारी नसली तरी शब्दांशिवाय ती व्यक्त तरी कशी होणार?

******************

आई या शब्दात सर्व विश्व सामावले आहे !!! दिला जन्म तू विश्व हे दाविलेस किती कष्ट तू माये सुखे साहिलेस जेण्यालाही माझ्या आकार तू दिलास तुझ्या वंदितो माउली पौलास तुझा कीर्ती विस्तार माझा प्रपंच तुझ्या कृपेने रंगला रंगमंच वठे भूमिका पाठ जैसा दिलास तुझ्या वंदितो माउली पौलास गुरु आद्य तू माझिया जीवनात तू पेरले धर्मबीज मनात प्रपंचात तू सत्पंथ दाविलेस तुझ्या वंदितो माउली पौलास तुझे थोर संस्कार आचार झाले तुझे यात्न् प्रामाण्य सिद्धीस गेले तुझ्या चिटणी लोप पावे निरास

******************

आई या दोन अक्षरांमध्ये सर्व ममत्व, माया,प्रेम सर्व काही सामावलेले आहे.स्वत: अंधारामध्ये राहून आपल्या पिलांना प्रकाश देणारी आई म्हणजे तेजस्विनी.आई म्हणजेच आयूष्याची खरी मार्गदर्शक.आई म्हणजे आधारवड. आई म्हणजे दिव्यत्वाचे दूसरे रूप.आईशिवाय आपले अस्तित्व असूच शकत नाही.जेवढी आईची सेवा जास्त तेवढा आपल्या आयुष्याचा मार्ग प्रशस्त म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी असतो.

******************

 

 

प्रतिक्रिया

No comments found.

New comment