सर्वोत्तम मराठी विनोद

बंटी आणि बबली

बंटी , बबली
बरोबर बागेत बसले होते, समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....
बंटी (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....
बबली : ठीक आहे,
माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे......
————-
दगडू : ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?
दुकानदार : एक रुपयाला एक
दगडू : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला.
दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.
दगडू : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.
 ————-
वकील आणि चोर
वकील : चोरी करताना स्वताच्या बायको मुलांचा विचार तुझ्या मनात नाही आला?
चोर : विचार आला होता साहेब, पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचाच समान मिळत होत..
.तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केलीय!’ तो म्हणाला.
‘पण मी काही तुझ्या पाठीमागे लागले नव्हते.’ ती ठसक्यात म्हणाली.
‘बरोबर आहे. सापळा कधी उंदराचा पाठलाग करतो का?’ त्यानं विचारलं
 ————-
बंडू आणि गुरुजी
गुरुजी - सांग बंडू? गांडूळ शेतकऱ्याचा मित्र कसा ????
बंडू - त्याच काय गुरुजी अं .अं
गुरुजी - अरे गाढवा सांग लवकर
गुरुजी - हं... गुरुजी शेतकरी शेतात एकट्यानेच राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणून.
 ————-
संपतराव आणि त्यांच्या सौ
संपतराव आपल्या
पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज अजूनं माझ्या पॅंटच्या खिशातले काही
पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी : कमाल आहे तुमच्या
अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून
तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?...
संपतराव : तू नक्कीच खिशात हात
घातलेला नाहीस, कारण त्यात ... अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
————-
टीचरनी विचारले , “बहुतांशी दाक्षिणात्य लोक काळेसावळे का असतात ?”
नन्या उत्तरला ,”कारण ते लोक सन स्क्रीन लोशन न लावता ‘सन टी.व्ही.’ , ‘सूर्या टि.व्ही.’ आणि ‘उदय टि.व्ही.’ पाहात असतात ना !!!”
————-

 


 

तुमचा अभिप्राय नोंदवा

No comments found.

New comment