या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांशी जुळत नाही,
कळतं सारं पण एक मात्र वळत नाही,
काय असते हि मैत्री हे दूर गेल्याशिवाय कळत नाही......

------------------------------------------------------------------

ज़न्माला आला आहेस

ज़न्माला आला आहेस

थोडं जगून बघ ,
जीवनात दु:ख खूप आहे ,
थोडं सोसून बघ !



चिमुट्भर दु:खाने कोसळू नकोस ,
दु:खाचे पहाड चडून बघ !
यशाची चव चाखून बघ ,
अपयश येत, निरखून बघ ,
डाव मांडणं सोपं असतं ,
थोडं खेळून बघ !
घरटं बांधणं सोपं असतं ,
थोडी मेहनत करुन बघ !
जगणं कठीण असतं , मरणं सोपं असतं ,
दोन्हीतल्या वेदना झेलून बघ !
ज़ीणं - मरणं एक कोडं असतं ,
जाता - जाता एवढं सोडवून बघ !

मराठी कविता

आपलं कसं मानावं..?

त्या येऊन जाणा-या लाटेशी

या बिचा-या किना-यानं कसं वागावं..?

ती परकी नसली तरी त्यानं

तिला आपलं कसं मानावं..?

-------------------------------------

 आयुष्याशी, वाद घालणे, जमले नाही

अन्‌ मृत्यूला, साद घालणे जमले नाही

जीवनवादी, मृत्यूवादी, वादी मीही

वाद, साद, फिर्याद घालणे, जमले नाही

न पटण्याचे, कोडे मजला,

न पटण्याचे, कोडे मजला, सुटले नाही

आयुष्याशी, कधीच माझे, पटले नाही

जी भ्रामकता, क्षितिजाची, ती अमुची होती

दोघांमधले, अंतर काही, मिटले नाही

सहनशीलता, सहनशीलता किती असावी

कसे म्हणावे, धरणीचे मन, विटले नाही

हात गुंफुनी, हाती दोघे, जिवलग डोंगर

दरीमुळेही, नाते त्यांचे, तुटले नाही

संशय आला, धरतीला का, आकाशाचा?

प्याल्यामध्ये, उगाच वादळ, उठले नाही

जितुका लुटता आला, तितुका सुगंध लुटला

पण वाऱ्याने, कळ्या फुलांना, लुटले नाही

अचंबीत ते, झाले माझ्या, होकारांनी

अफवांचे मग, पेव `इलाही' फुटले नाही

---------------------------------------

उपदेश देयला सगलेच असतात

मात्र समजून घेणार कोणीच का नसते

सुखात सगलेच सहभागी होतात

पण दुखत मात्र अदृश्य का होतात

जीवंत असताना कोणीच जवळ नसते

मग मेल्यावर का सगळे एकत्र येतात

हे आयुष्य असे का असते

जिथे गरज असताना कोणीच का नसते??????

------------------------------------------

 मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,

जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

खूप सोप असत इथे हातात हात घालून रानोमाल भटकायला,

तर कधी नीजून तीच्या मांडीवर पुनवेचा चंद्र बघायला,

शब्दही सापडतात अलगद इथे तीची स्तुती करायला,

संधीही नाही मीळत तीला मग खोटे खोटे ही रुसयला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,

जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

नाही लागत परवानगी कुणाची सीनेमा बघायला,

खूप मजा येते यार इथे बाइक वर फीरायला,

ती चाही असतो होकार नेहमी माझ्या मीठीत यायला,

कशाचीच उपमा नाही दोस्तांनो तीच्या कुशीत नीजायला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,

जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

...पण काय सांगू मीत्रानो तीचाच एस एम एस येतो शेवटी,

मला स्वप्नातून जागे करायला...!

-------------------------------------------

आहे बरेच काही सांगायला मला

काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती

(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे

जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?

येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?

आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला

होतेच शब्द कोठे बोलायला मला?

-------------------------------------------

तुझी आठवण आली ना की मला माझाच राग येतो,

संपले ना सर्व तुझ्याकडुन, मग असा का त्रास देतो?

नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी,

आठवुन सर्व काय करु? मग डोळ्यांत येते पाणी...!!!!

 

मैत्री

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस

सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस

भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं

जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस

व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा

दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे

'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस

जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!

 

काही क्षणाची सोबत....
पुरेशी असते जन्माभरासाठी
जगण्यासाठी दोनच शब्द
पूरतात आयुष्यभरासाठी

काही क्षणांचा सहवास....
जगण्याचे कारण बनून जातो
प्रेमाचे दोन शब्दच मग
आयुष्यच धेयय बनून जात

काही क्षणाची आठवन
उत्साह देते मनाला
जणू सर्व आकाश आपलेच आहे
मनसोक्त उडायला.....

--------------------------------------------------------

प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे

नाही बांधू शकत ताज महल मी
म्हणुन काय मी शोक करत बसायचे
प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे
ठरविले मी काही तरी लिहायचे
घेतला आधार मी शायरीचा
आणि ठरविले मनसोक्त वहायचे
नाही जमल ताज महल तर
यमुनेचे पवित्र पाणी आपण व्हायचे
नाही होऊ शकत नायक मी
म्हणुन काय नालायक व्हायचे
खुप मनापासून केलेल प्रेम
पायाखाली तूडवायचे .
ठरविले मी नाही आता नाही
तटस्थ आपण रहायचे
थोडून सारी बंधने
प्रेमसागारत डुबायचे

-----------------------------------------------------

नक्षञांचे प्रेम

नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

तिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची
त्याची सवय कही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरिही
त्याने जिद्द माञ सोडलेली नसते
तीच्या सौंदर्याचं गुणगाण करण्याचा
जणू छंदच त्याला जडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

पान-टपरी वाल्यांकडे त्याची
अगदी महिनो-महिने उधारी असते
तरी, तिच्यासाठी चंद्र-तारे आणण्याची
त्याची एका पायावर तयारी असते

तीच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार,
त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

तिच्यासाठी गुलाब तोडताना तो
कधी काट्यांचीही तमा बाळगत नाही
आणि ती सोबत असेपर्यंत त्याला,
दुःखं कधीच उमगत नाही

तिच्या क्षणभर दुराव्यानेही,
तो दुःख सागरत बुडालेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

बरं यालाच प्रेम म्हणावे तर,
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतचं प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून
अगदी शुध्द प्रेमाची आशा करतात

अशाच समाज-कंटकांमुळे,
प्रत्येकजण प्रेमात थोडा रखडलेला असतो
तरीदेखील प्रत्येकजण केव्हा ना केव्हा
एकदातरी प्रेमात पडलेला असतो
एकदातरी प्रेमात पडलेला असतो ...!!

------------------------------------------------------------

 

 
 
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा....!!! आजचा दिवस सुखाचा आनंदाचा , समृद्धीचा जावो ,हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!!!